बिजनौर : नजीबाबाद येथील किसान सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी युनिटचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते ऑक्टोबर २०१७ मध्ये उद्घाटन करण्यात आले होते. दररोज ४०,००० लिटर इथेनॉल उत्पादन क्षमतेचे, ५६ कोटी रुपये खर्चाचे हे डिस्टिलरी युनिट सुरुवातीला एका खाजगी कंपनीला सोपवण्यात आले होते. उद्घाटनानंतर, दिल्लीस्थित ‘इजॅक कंपनी’ने बऱ्याच काळासाठी हे युनिट चालवले. कोविड-१९ महामारीनंतर आर्थिक आव्हानांमुळे कंपनीने कामकाज बंद केले. नंतर लखनौतील सिसोदिया संशोधन प्रयोगशाळेने २०२१ ते २०२४ या काळात डिस्टिलरी प्लांटचे व्यवस्थापन केले. बी-हेवी मळीच्या उत्पादनाचा जास्त खर्च आणि इथेनॉल तयार होईपर्यंतच्या उत्पादनाचा जास्त खर्च यामुळे इथेनॉल उत्पादन मार्च २०२४ पासून थांबविण्यात आले आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. आता राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने हा प्लांट पुन्हा सुरू व्हावा यासाठी प्रयत्न चालवले आहेत.
खाजगी कंपनीसाठी इथेनॉल उत्पादनाचा जास्त खर्च आणि कमी बाजारभाव अशी स्थिती झाल्याने डिस्टिलरी युनिट चालवणे आव्हान बनले. कामगारांना वेळेवर पगार न मिळाल्याने संप झाले. त्यातून खाजगी कंपनीला डिस्टिलरी युनिट चालवण्यापासून माघार घेण्यास भाग पडले. बी-हेवी मळीच्या उत्पादनाचा जास्त खर्च आणि इथेनॉल तयार होईपर्यंतच्या उत्पादनाचा जास्त खर्च यामुळे डिस्टिलरी युनिटला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. दरम्यान, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने साखर कारखान्याचे डिस्टिलरी युनिट बंद होण्यामागील कारणे, मळीच्या उत्पादनाचा आणि तयार इथेनॉल उत्पादनाचा जास्त खर्च, उत्पादनाची बाजारभाव तपासण्याचे काम सुरू केले आहे. इथेनॉल उत्पादन पुन्हा सुरू करता यावे यासाठी महासंघाचा अभ्यास सुरू असल्याची माहिती कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक महिपाल सिंग यांनी दिली.


















