उत्तराखंड: ऊस सर्वेक्षणाच्या कामाची तपासणी

रुडकी: लिब्बरहेडी ऊस विकास विभागाच्या पथकाने कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या ऊस सर्व्हेच्या कामकाजांची ठिकठिकाणी पाहणी केली. ऊस विभागाचे पर्यवेक्षक आणि साखर कारखान्यांच्या ऊस पर्यवेक्षकांकडून सुरू असलेल्या सर्व्हेची पडताळणी करण्यात आली.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सीडीआय बि. के. चौधरी यांनी सांगितले की, सद्यस्थितीत हायटेक तंत्रज्ञानाद्वारे ऊस सर्व्हे करण्यात येत आहे. यावेळी सर्व ऊस पर्यवेक्षकांना कामकाजात गती आणण्याचे निर्देश देण्यात आली. सर्व्हेच्या आधारावर कारखान्यांना उसाचे वाटप करण्यात येईल. पथकाने भरतपूर, नगला चिना, बुढपूर जट, नारसन खुर्दमध्ये विविध शेतीची पाहणी केली. यावेळी ऊस पर्यवेक्षक विजय कुमार शर्मा, परमिंदर कुार, सुबोध कुमार, दीपक कुमार, देवेंद्रे सिंह, शेतकरी शोभित चौधरी, मानवेंद्र चौधरी, आकाश कुमार, अविनाश सिंह, प्रमोद सिंह, देवेंद्र पाल, स्वराज सिंह, अवलीन लोहान आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here