विघ्नहर कारखान्याचे ११ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट: सत्यशील शेरकर

पुणे : जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यामध्ये आगामी २०२३ – २४ गाळप हंगामामध्ये ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी दिली. विघ्नहर साखर कारखान्यामध्ये आगामी गाळप हंगामासाठी मिल रोलरचे पूजन करण्यात आले, त्यावेळी शेरकर बोलत होते. ते म्हणाले, कारखाना कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात उसाची लागवड होत आहे. आगामी गाळप हंगामासाठी मशिनरी देखभाल आणि दुरुस्तीची कामे गतीने सुरु आहेत. त्याचबरोबर सहवीज निर्मिती आणि डिस्टलरी प्रकल्पाची कामेही वेगाने सुरु असल्याचे शेरकर यांनी सांगितले.

शेरकर यांनी सांगितले कि, विघ्नहर कारखान्याचा ६५ केएलपीडी क्षमतेचा डिस्टलरी विस्तारीकरण प्रकल्प पूर्ण झाला आहे. यावेळी व्हाईस चेअरमन अशोक घोलप, कार्यकारी संचालक भास्कर घुले यांच्यासह सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उ सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here