आगामी हंगामात विश्वास सहकारी साखर कारखाना पूर्ण क्षमतेने गाळप करेल : संचालक विराज नाईक

सांगली : विश्वास सहकारी साखर कारखाना २०२६-२७ गळीत हंगामासाठी पूर्ण क्षमतेने गाळप करेल, असा विश्वास कारखान्याचे संचालक व जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांनी व्यक्त केला. चिखली येथील विश्वासराव नाईक कारखान्यात तोडणी-वाहतूक कराराचा त्यांच्या हस्ते प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. विराज नाईक म्हणाले, नुकत्याच झालेल्या हंगामात उसाची उपलब्धता कमी होती. त्यामुळे हंगाम काहीसा अडचणीचा गेला. राज्यातील बहुतांश कारखान्यांची अशीच परिस्थिती होती, असे ते म्हणाले.

आगामी हंगामाचे कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंग नाईक, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील व संचालक मंडळाने काटेकोरपणे नियोजन केले आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी कार्यकारी संचालक अमोल पाटील, शेती अधिकारी ए. ए. पाटील यांनी स्वागत केले. दीपक पाटील, मुख्य लेखापाल दताजीराव देसाई, ए. एस. पाटील, सागर पाटील, अशोक सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते. संदीप पाटील यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here