मवाना साखर कारखान्याकडून १२ कोटींची बिले अदा

123

मवाना साखर कारखान्याने गुरुवारी गळीत हंगाम २०२०-२१ मधील एक एप्रिल २०२१ पर्यंत खरेदी केलेल्या उसापोटी १२ कोटी रुपयांची बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पाठविण्यात आली आहेत. कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी या ऊस बिलांची अॅडव्हायजरी ऊस समित्यांना दिली आहे. गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये खरेदी केलेल्या उसापोटी ५२५.४३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. एकूण खरेदी केलेल्या उसाच्या ८१ टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे.

कारखान्याच्या ऊस तथा प्रशासन विभागाचे वरिष्ठ महा व्यवस्थापक प्रमोद बालियान यांनी सांगितले की, कारखान्यातर्फे साखर विक्री केली जात आहे. त्यातून मिळणाऱ्या रक्कमेपैकी ८५ टक्के पैसे शेतकऱ्यांना दिले जात आहेत. साखर कारखान्याने शेतकऱ्यांना गतीने पैसे देण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. उसाच्या सर्व्हेचे काम पूर्ण झाले आहे. ऊस विभागाने दिलेल्या निर्देशानुसार ऑनलाईन घोषणापत्र शेतकऱ्यांनी देऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here