ओडिशातील रिफायनरीत पाचट, पेंढ्यापासून बनणार १ जी-२जी इथेनॉल, हरित ऊर्जेचे नवे पााऊल

भुवनेश्वर : ओडिशातील बरगड येथे देशातील पहिली एकात्मिक प्रथम पिढी (१जी) आणि द्वितीय पिढी (२जी) बायो-इथेनॉल रिफायनरी कार्यान्वित होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ४ जुलै रोजी १,७७५ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पाची वार्षिक ६.३ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन क्षमता आहे. त्यामुळे भारताच्या जैवइंधन धोरणात हा मैलाचा दगड मानला जात आहे. केंद्र सरकार जैव कचऱ्यापासून इथेनॉल निर्मितीकडे विशेष लक्ष देत आहे. या केंद्रात इथेनॉल निर्मितीसाठी शेतातील पाचट, भाताचा पेंढा याचा वापर करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत इथेनॉल निर्मितीसाठी ऊस क्षेत्राच्या वाढीला मर्यादा आहेत. त्यामुळे केंद्र सरकार नवनवे पर्याय स्वीकारत आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे १.६ लाख एकर क्षेत्रातील शेतकऱ्यांकडून दरवर्षी दोन लाख टनांहून अधिक भाताचा पेंढा खरेदी केला जाणार आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना पेंढ्याची हमी बाजारपेठ उपलब्ध होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेत दरवर्षी १०० कोटी रुपयांहून अधिक निधीची भर पडण्याचा अंदाज आहे. प्रकल्पातून ८०० थेट, तर जैव-अवशेष संकलन, वाहतूक, साठवण आणि पूरक उद्योगांमधून सुमारे १ हजार २०० अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. देशाच्या ऊर्जा सुरक्षिततेला बळकटी देतानाच कृषी अवशेषांचे मूल्यवर्धन आणि स्वच्छ इंधन निर्मितीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने हे प्रयत्न चालवले आहेत. योजनेअंतर्गत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ने विकसित केलेला हा देशातील पहिला व्यावसायिक प्रकल्प आहे, जिथे अतिरिक्त तांदूळ आणि भाताचा पेंढा या दोन्हींपासून इथेनॉलची निर्मिती केली जाणार आहे. अतिरिक्त व तुटलेल्या तांदळापासून पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी आवश्यक इंधन दर्जाचे इथेनॉल तयार होणार आहे. शिवाय, दररोज ४८० टन भाताच्या पेंढ्यावर प्रक्रिया करून १०० किलोलीटर रजी इथेनॉलची निर्मिती केली जाईल. पाचट जाळण्यामुळे होणारे वायूप्रदूषण आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यास मोठी मदत होणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here