विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडून प्रतिटन २८०० रुपये जमा : संस्थापक, अध्यक्ष बबनराव शिंदे

सोलापूर : विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या युनिट नंबर १ पिंपळनेर व युनिट नंबर २ करकंब कारखान्याचे २१ ते ३१ जानेवारीअखेर प्रतिटन २८०० रुपयांप्रमाणे ऊसबिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असून, १५ जानेवारीअखेर ऊस तोडणी वाहतूक बिले अदा करण्यात आली असल्याची माहिती साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.

माजी आमदार बबनराव शिंदे म्हणाले, की विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर १ पिंपळनेर व युनिट नंबर २ करकंब येथील सन २०२४-२५ चा गाळप हंगाम सुरू आहे. या हंगामात युनिट नंबर १ येथे आजअखेर १० लाख ३८ हजार ७९४ मे. टन ऊस गाळप झाले आहे. युनिट नंबर २ येथे आजअखेर ३ लाख ५२ हजार ४९५ मे. टन उसाचे गाळप झाले आहे. दोन्ही युनिटचे मिळून आजअखेर १३ लाख ९१ हजार २८९ मे.टन उसाचे गाळप झालेले आहे. या गळीत हंगामामध्ये युनिट नंबर १ पिंपळनेर व युनिट नंबर २ करकंब कडे २१ ते ३१ जानेवारी कालावधीत गाळपास आलेल्या १० दिवसांच्या उसास प्रतिटन २८०० रुपयांप्रमाणे पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले.

ChiniMandi WhatsApp Channel

दहा दिवसाला व वेळेत पेमेंट देणाची परंपरा विठ्ठलराव शिंदे कारखान्याने कायम राखली आहे. या ऊस बिलापोटी कारखान्याने ५७ कोटी ७७लाख रुपये बँकेत जमा केले आहेत. या गाळप हंगामात कारखान्याने ऊस बिलासाठी ३४३ कोटी २१ लाख रुपये अदा केलेले आहेत. १ ते १५ जानेवारीअखेर ऊसतोडणी वाहतूक बिले अदा करण्यात आली असून, त्यापोटी कारखान्याने २२ कोटी ९८ लाख रुपये अदा केलेले आहेत. १५ जानेवारीअखेर ऊसतोडणी वाहतूक बिलासाठी एकूण ७८ कोटी ६२ लाख रुपये अदा केल्याची माहिती अध्यक्ष माजी आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here