राज्यात दररोज ५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

चालू वर्षाची शेतकऱ्यांची परीस्थिती ही मागील वर्षांपेक्षा काही वेगळी नाही, दुष्काळ, नापिकी, बँकाची तसेच सावकारी कर्जे यामध्ये शेतकरी पूर्णच बुडाला आहे त्यातून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग दिसेना त्यातच वाढती महागाई, मुला मुलींची लग्ने, ज्यांची मुळे नुकतीच १२ वी पास झालेत व १० वी पास होणार त्यांच्यासाठी पुढील शिक्षणाचा खर्चाचा डोंगरच उभा आहे आणि त्यात भर म्हणजे चालू असलेला मोठा दुष्काळ त्यामुळे विहिरींना पाणी नसल्यामुळे पिके खराब होत आहेत, नागरिकांना आणि जनावरांना प्यायला पाणी नाही व जनावरांना पुरेसा चार पण उपलब्ध नाही, असे एक नाहीतर हजारो प्रश्न शेतकऱ्यांकडे आवासून उभे आहेत आणि या सर्व खर्चाना व समस्येना कंटाळून शेवटी शेतकरी आत्महत्या करतात व आपले जीवन संपवतात आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.

मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अहवालानुसार मागील पाच महिन्यात दररोज सरासरी ५ शेतकरी आपली जीवनयात्रा संपवीत आहेत आणि सरकारी मदतीचा लाभ चालू वर्षातील आत्महत्याग्रस्त ८०९ शेतकऱ्यांपैकी फक्त २०९ कुटुंबानाच मिळाला आहे, आत्महत्येच्या विभागीय सद्यस्थिती कडे पाहीले तर मागील पाच महिन्यात औरंगाबामध्ये २०१, पुण्यामध्ये ४७, नाशिकमध्ये १९५ अमरावती मध्ये ४२ आणि नागपूर मध्ये ५४ शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

सरकारकडून बहुतांश शेतकऱ्यांना दुष्काळ आणि पीकविम्याची पूर्ण रक्कम मिळालेली नाही आणि कर्जमाफीचा लाभ पण मिळालेला नाही असे शेतकऱ्यांचे मत आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात म्हणून बर्याच योजनांचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक थेट बँकखात्यात दिला जातोय, दुष्काळ निधी, गारपीट, अवकाळी अनुदान हे सर्वांनाच दिले आहे आणि जर कुणाला मिळाले नसेल तर त्याची माहिती घेऊन संबधित त्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील, संपूर्ण कर्जमाफी होईल की नाही हे सांगता येणार नाही पण शेतकर्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी सरकार प्रामुख्याने मदत करेल असे वक्तव्य सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here