शंकर सहकारी साखर कारखान्यासाठी ६५.६३ टक्के मतदान

सोलापूर : सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांसाठी २३ अर्ज राहिले होते. या पंचवार्षिक निवडणुकीत माळशिरस गटातून गोपाळराव गोरे व इस्लामपूर गटातून उत्तम बाबर हे दोन विरोधी उमेदवारांचे अर्ज असल्याने या दोन गटांमध्ये निवडणूक लागली होती. या निवडणुकीसाठी ५८७७ मतदारांपैकी ३८५७ मतदान होऊन ६५.६३ टक्के मतदान झाले आहे.

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीत माळशिरस उत्पादक गटातून मिलिंद कुलकर्णी, सुरेश पाटील, महादेव शिंदे व गोपाळ गोरे, तर इस्लामपूर उत्पादक गटातून बाळासाहेब माने, दत्तात्रय रणवरे, कुमार पाटील व उत्तम बाबर या दोन गटांत निवडणूक झाली. माळशिरस मतदान केंद्रातून ७१.९८ टक्के, बोंडले केंद्रातून ६६.३० टक्के, मांडवे केंद्रातून ९३.५९ टक्के, इस्लामपूर केंद्रातून ७९.७७ टक्के, भाळवणी तालुका पंढरपूर केंद्रातून ७६.५७ टक्के, म्हसवड तालुका माण केंद्रातून ५३.१० टक्के, नातेपुते केंद्रातून ६५.४६ टक्के मतदान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here