अहिल्यानगर : सहकार महर्षी थोरात कारखान्याचा १३ नोव्हेंबर रोजी गळीत हंगाम शुभारंभ

अहिल्यानगर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज, बुधवार १३ नोव्हेंबर रोजी सकाळी आमदार बाळासाहेब थोरात व कांचनताई थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, अॅड. माधवराव कानवडे, डॉ. जयश्रीताई थोरात, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष संतोष हासे यांनी दिली आहे.

थोरात कारखान्यावर सभासद, शेतकरी व कार्यक्षेत्राबाहेरिल ऊस उत्पादक यांचाही मोठा विश्वास आहे. या कारखान्याने मागील हंगामात कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांकरता ३ हजार १५ रुपये भाव दिला होता. या गळीत हंगामाचा शुभारंभ सकाळी ८.३० वा. होणार आहेत. तरी ऊस गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी तालुक्यातील सभासद व शेतकरी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here