सांगली : ‘कोल्हापूर पॅटर्न’नुसार ऊस दर देण्याबाबत साखर कारखान्यांचे मौन, पुन्हा आंदोलनाची शक्यता

सांगली : कोल्हापूर जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामात उसाला ४२०० रुपयांये दर देण्याच्या सूत्रानुसार पहिली उचल ३९०० रुपये, गाळप हंगाम संपल्यानंतर १०० रुपये आणि साखरेच्या दराच्या अधीन राहून आणखी २०० रुपये देण्याचे निश्चित झाले आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील कारखानदारांनीही त्याच सूत्रानुसार दर जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली होती. त्यासाठी कारखानदारांना मुदत देत दर जाहीर न केल्यास धुराडी बंद पाडण्याचा इशाराही दिला होता. मात्र, मुदत उलटून गेल्यानंतरही जिल्ह्यातील कारखानदारांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. कोल्हापुरात या सूत्रावर तोडगा निघाला असताना सांगलीत मात्र कारखानदारांनी मौन बाळगले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील या सूत्राची अंमलबजावणी जिल्ह्यात होणार की कारखानदार स्वतंत्र भूमिका घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सांगलीतील ऊसदराचा तिढा कायम असून, कारखानदारांच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. आता सण संपल्यानंतर ऊसदराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. दर जाहीर करण्याबाबत कारखानदारांकडून हालचाल न झाल्यास संघटना आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. ऊस वाहतूक रोखण्यापासून थेट कारखान्यांचा काटा बंद पाडण्यापर्यंतच्या आंदोलनाचा इशारा यापूर्वीच देण्यात आला आहे. कोल्हापूर पॅटर्ननुसार उसाला प्रतिटन ४२०० रुपये दर देण्याबाबत जिल्ह्यातील १६ पैकी एकाही कारखान्याने अधिकृत दर जाहीर केलेला नाही.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here