सातारा : कृष्णा साखर कारखान्यामध्ये ऊसतोडणी वाहतूक करारास प्रारंभ

सातारा : य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये गळीत हंगाम २०२५-२६ साठी ऊसतोडणी, वाहतूक करारांचा प्रारंभ करण्यात आला. कारखान्याचे संचालक वसंतराव शिंदे यांच्या हस्ते व व्हाइस चेअरमन जगदीश जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात तोडणी वाहतूकदारांना करारपत्रांचे वाटप करण्यात आले. व्हाइस चेअरमन जगदीश जगताप यांनी, ‘कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व संचालक, अधिकारी, शेतकरी, ऊसतोडणी वाहतूकदार, कंत्राटदारांनी यंदाचा गळीत हंगाम यशस्वी पार पडला. आगामी गळीत हंगामही आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन केले.

मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी ऊसतोडणी वाहतूकदार, कंत्राटदार यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला संचालक संजय पाटील, जे. डी. मोरे, अविनाश खरात, विलास भंडारे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले यांची प्रमुख उपस्थिती होती. इथून पुढे गळीत हंगामांचा कालावधी लहान असणार आहे. त्यामुळे नियोजनबद्ध तोडणी यंत्रणा राबवून आपण गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडूया, असे आवाहन सुतार यांनी केले. जनरल मॅनेजर (केन) दादासाहेब शेळके, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, एच. आर. मॅनेजर संदीप भोसले, सहाय्यक शेती अधिकारी अजय दुपटे, सहाय्यक ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर, केनयार्ड सुपरवायझर विजय मोहिते आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here