पैठण : येथील श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या रिक्त दोन संचालक पदांसाठी शुक्रवारी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. या दोन्ही जागांसाठी प्रत्येकी एक अर्ज आला होता. त्यामुळे कावसन गटातून विजया विक्रमराव घायाळ यांची आणि पाचोड गटातून प्रवीण घायाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीयसह निबंधक संतोष बिडवई, किरण चौधरी यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित संचालक विजया घायाळ, प्रवीण घायाळ यांचा साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष काकासाहेब गोरे, ज्ञानदेव नवले, गणेश पवार, सुखदेव थोरात, अनिल रोडे, सुनील घायाळ, अमोल घायाळ आदींनी सत्कार केला.
निवडीनंतर साखर कारखान्यावर संचालक मंडळाने शिवसेना उपनेते तथा सीए सचिन घायाळ यांच्या नेतृत्वाखाली गुलाल उधळून आनंद साजरा केला. यावेळी संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन गणेश घायाळ, संचालक आबासाहेब मोरे, एकनाथ नवले, भाऊसाहेब पिसे, प्रवीण घायाळ, दीपक फांदाडे, रमेश झिने, शिवाजी जाधव, बाबासाहेब खरात, ताराबाई घायाळ, उषाबाई थोरात, अनुराधा तुपकरी, विक्रम घायाळ, ॲड. रवींद्र घायाळ, रामेश्वर चितळे आदी उपस्थित होते.