कोल्हापूर : ओलम (हेमरस) साखर कारखान्याच्या १६ व्या गळीत हंगामाचे मिल रोलरचे पूजन युनिट हेड संतोष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. रोलर लिप्टींग जयदीप जैन यांच्या हस्ते झाले. शेती अधिकारी संग्राम पाटील उपस्थित होते. कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. गाळप क्षमता वाढली आहे. कारखाना चालू गळीत हंगामात आठ लाख टन ऊस गाळप करणार आहे, अशी माहिती युनिट हेट संतोष देसाई यांनी दिली.
देसाई यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कारखान्याची वाटचाल सुरू आहे. ऊस उत्पादनात एकरी वाढ व्हावी, यासाठी खास कार्यक्रम राबविला जात आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ऊस बियाण्यांपासून खत, पाणी नियोजनापर्यंत मार्गदर्शन केले जात आहे. कारखान्याकडे ऊस नोंद पुरेशी झाली असून यावर्षी ऊस तोडणी व वाहतूक व्यवस्था सक्षम केली आहे. शेतकऱ्यांचा वेळेवर ऊस उचल केला जाईल. यावेळी महेश भोसले, सुभाष दोरा, संतराम गुरव, अनिल पाटील, नामदेव पाटील आदी उपस्थित होते.