कोल्हापूर : अथणी शुगर्स- उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगामात सात लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट पूर्ण करेल, असे प्रतिपादन कारखान्याचे व जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांनी केले. अथणी शुगर्स, युनिट उदयसिंगराव गायकवाड साखर कारखान्याच्या २४व्या गळीत हंगामाच्या मिल रोलर पूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सर्व संचालक, तसेच अधिकारी उपस्थित होते.
रणवीरसिंग गायकवाड म्हणाले कि, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आगामी गाळप हंगामात जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी पाठवावा. उपाध्यक्ष गणीभाई ताम्हणकर, संचालक गणपती पाटील, पंडित थोरात, दत्तात्रय मिश्राम, बाजार समितीचे माजी संचालक शेखर येडगे, कार्यकारी संचालक भगवान पाटील. युनिट हेड रवींद्र देशमुख, प्रल्हाद पाटील, सदाशिव पाटील-शिंपेकर, दिलीप बंडगर, जगन्नाथ जोशी, सर्व संचालक सर्व अधिकारी, कर्मचारीवर्ग उपस्थित होते.