कोल्हापूर : ऊस तोडणी मजुरांना अधिकाधिक सुविधा देण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

कोल्हापूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ अनुदान योजनेच्या अनुषंगाने झालेल्या जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक झाली. समितीचे सदस्य सचिव तथा सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांच्यासह महिला बाल विकास, शिक्षण, कामगार, परिवहन, पुरवठा, साखर, पोलिस विभाग व साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊसतोड मजुरांना जास्तीत जास्त सुविधांचा लाभ द्यावा. तसेच यामध्ये आचारसंहितेची अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी’, असे निर्देश दिले.

जिल्ह्यात ८२२ विद्यार्थी साखरशाळेपासून वंचित असून त्यांना शाळेत समाविष्ट करावे. तसेच एकही मुलगा शाळेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली. सचिन साळे यांनी २०२५-२६ या वर्षांमध्ये ऊसतोड कामगार सानुग्रह अनुदान योजनेसाठी २० प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यातील आठ प्रस्ताव पात्र असल्याचे सांगितले. यावेळी ऊसतोड कामगारांच्या अनुषंगाने उच्च न्यायालयात याचिका दाखल असून या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी त्यांच्याकडे असणारी पूर्ण माहिती द्यावी, अशी सूचनाही करण्यात आली. याशिवाय, ऊस तोडणी कामगारांकडून पशूधन असलेल्या बैलांचे टॅगिंग करावे. या योजनेच्या अनुषंगाने त्रुटींची पूर्तता पूर्ण करून पुन्हा प्रस्ताव पाठवावेत अशा सूचना या बैठकीत करण्यात आल्या.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here