उगार खुर्द : केंपवाड येथील अथणी साखर कारखान्यात कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री श्रीमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर झाले. गेल्या वीस वर्षांपासून या शिबिराचा उपक्रम सुरू आहे. या परिसरातील रुग्णांना उपचारासाठी परगावी जाऊन येण्यास जास्त खर्च येतो. वेळही जास्त लागतो. यासाठी या आरोग्य तपासणी शिबिरात परिसरातील हजारो रुग्ण तपासणीसाठी आले होते. सुमारे तीन हजार नेत्र रुग्णांची तपासणी केली. त्यांना आवश्यक ते उपचार सांगितले.
श्रीमंत पाटील फाउंडेशन सेवासदन हॉस्पिटल-सांगली व नंदादीप हॉस्पिटल-सांगली यांनी या दोन दिवसीय शिबिराचे आयोजन केले होते. त्याला परिसरातील रुग्णाकडून प्रतिसाद मिळाला. हे शिबिर दोन दिवस झाले. शिबिरात सहभागी सर्व रक्तदात्यांना पारितोषिके दिली. तीन हजार रुग्णांची नाक, कान, घसा, हृदय, रक्तदाब बायपास सर्जरी, सर्दी, खोकला आदींची तपासणी केली. यावेळी आयोजित शिबिरात ४०० जणांनी रक्तदान केले.

















