कोल्हापूर: श्री भोगावती सहकारी साखर कारखाना, कृषी विज्ञान केंद्र बारामती, वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी येथे आयोजित शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कारखाना कार्यक्षेत्रातील परिते, म्हाळुंगे, बेले, कुरुकली, हळदी, कारभारवाडी, बाचणी, घोटवडे येथील शेतकरी यावेळी उपस्थित होते. गावांमध्ये ऊस पिकामध्ये प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्ता ( एआय) पद्धती तंत्रज्ञानाचे वेदर स्टेशन सांगणारी कार्यप्रणालीचे पूजन कारखान्याचे चेअरमन प्रा. शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन पाटील म्हणाले की, एआय तंत्रज्ञानाचा वापर ऊस शेतीसाठी फायदेशीर ठरत आहे. भोगावती कारखान्याच्या वतीने ऊस शेतीमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. या कार्यक्रमात एआय तंत्रज्ञानामुळे ऊस पिकांना पाणी कधी द्यावे ?खताची मात्रा किती द्यावी? कशी वापरावी? हवामानाचा अंदाज हवामानावर आधारित पिके घेण्यासंदर्भात यावेळी माहिती देण्यात आली. कारखान्याचे ऊस विकास अधिकारी विजय पाटील कारखान्याचे ओव्हरसिअर प्रकाश पाटील, अतुल चौगुले, भारत किरुळकर, निनाद पाटील, अमित पाटील, तसेच वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पाटील हळदीकर आदी उपस्थित होते.


















