कोल्हापूर : हवामान बदलास प्रतिकारक उसाच्या वाणांचे संशोधन करण्याचे आवाहन

कोल्हापूर : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी कोल्हापूर येथील प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्रास भेट देऊन आढावा घेतला. यावेळी केंद्रातील शास्त्रज्ञांनी उसाच्या नवीन वाणांची वैशिष्ट्ये, त्यांची उत्पादनक्षमता, कीड- रोग प्रतिकारशक्ती तसेच आधुनिक गूळनिर्मिती तंत्रज्ञानाबाबत सादरीकरण केले. विशेषतः ऊस उत्पादकता वाढविणे आणि उच्च दर्जाचा गूळ तयार करण्यासाठी सुरू असलेल्या संशोधनाबाबत माहिती देण्यात आली.

कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी यावेळी ऊस हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख पीक आहे. हवामान बदलाच्या व पूरस्थितीस सहनशील ऊस वाण विकसित करणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने संशोधन करा, असे आवाहन केले. संस्थेच्या विविध संशोधन प्रकल्पांची तसेच प्रायोगिक तत्त्वावरील ऊसपिकांची त्यांनी पाहणी केली. सोनाली पवार (कोल्हापूर), प्रियांका कांबळे (केर्ली), कल्पना कांबळे (निगवे दुमाला) यांनी मनोगत व्यक्त केले. विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुनील कराड, प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. विद्यासागर गेडाम तसेच डॉ. दीपक सावळे, डॉ. गोविंद येनगे, डॉ. चंद्रकांत कांबळे आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here