जालना : १० लाख ६२ हजार मे. टन ऊस गाळप करून समर्थ कारखान्याच्या गाळप हंगामाची सांगता

जालना : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना लि., अंकुशनगर (युनिट क्र. १) चा २०२५-२६ या गळीत हंगामाचा सांगता समारंभ मंगळवारी (दि. ३१) संचालक अशोकराव मांगदरे यांच्या हस्ते सपत्निक सत्यनारायण पूजेनंतर उत्साहात पार पडला. कारखान्याचा गळीत हंगाम ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू झाला. गेले १४२ दिवस चाललेल्या हंगामाची सांगता २६ मार्च रोजी झाली. हंगामात कारखान्याच्या अंकुशनगरमध्ये १० लाख ६२ हजार ३६५ मे. टन ऊस गाळप होऊन ६ लाख ८३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. हंगाम यशस्वी होण्यामागे मार्गदर्शक, माजी मंत्री राजेश टोपे, अध्यक्षा, उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे योगदान राहिले. दरम्यान, पुढील २०२६-२७ चा गळीत हंगाम ऑक्टोबर २०२६ च्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याच्या दृष्टीने ऑफ सीझन कामांचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली.

गळीत हंगाम सांगता समारंभात कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार, संचालक, व्यवस्थापकीय संचालक, विविध खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात अधिकारी, खाते प्रमुख व कंत्राटदारांचा सत्कार करून गौरव करण्यात आला. कारखान्याच्या तीर्थपुरी येथील युनिट क्र. २ (सागर)मध्ये ४ लाख ७६ हजार मे. टन ऊस गाळप होऊन ३ लाख ३० हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. दोन्ही युनिट मिळून १५ लाख ३८ हजार मे. टन ऊस गाळप होऊन १० लाख १४ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याचे सांगण्यात आले. कारखान्याचे दोन्ही डिस्टिलरी प्रकल्प ऑफ- सीझनमध्येही सुरू राहणार आहेत अशी माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here