अवकाळी पाऊस, गारपीट झाल्यास ऊस पिकाची काळजी घेण्याचे शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे आवाहन

कोल्हापूर : अवकाळी पाऊस व गारपीट या दोन्ही घटकांचा ऊस शेतीवर प्रतिकूल परिणाम होतो. गारपिटीमुळे उसाच्या पानांचे नुकसान होऊन प्रकाश संश्लेषणावर परिणाम होतो. त्यामुळे ऊस पिकाची वाढ मंदावते. परिणामी उत्पादनात घट येते. अशावेळी शेतकऱ्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत वसंतदादा शुगर इ्स्टिट्यूटचे वैज्ञानिक अधिकारी डॉ. समाधान सुरवसे यांनी व्यक्त केले. अवकाळी पावसामुळे जमिनीतून अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणावर वाहून जातात. अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचते व मुळांना ऑक्सिजन कमी मिळतो. ऊस कांड्यांवर जखमा व भेगा पडल्याने रस साठवण्याची क्षमता घटते.गारांच्या माऱ्यामुळे झालेल्या जखमांमधून बुरशी व जिवाणूंचा सहज प्रवेश पिकात होतो. त्यामुळे लाल कुज, स्मट यांसारख्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो. याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे असे ते म्हणाले.

सद्यस्थितीत राज्याच्या अनेक भागांमध्ये गारपीट व अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हवामानात अचानक झालेल्या बदलांमुळे वादळी वारे, मेघगर्जना आणि गारांसह पाऊस पडत आहे. गारपीट आणि अवकाळी पाऊस हे हवामानातील बदलत्या व अनिश्चित प्रक्रियांमुळे निर्माण होणारे नैसर्गिक प्रकार आहेत. अवकाळी पावसामुळे पीक वाढीच्या विविध टप्प्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज घेणे, योग्य पीक व्यवस्थापन पद्धती अवलंबणे आणि संरक्षणात्मक उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक ठरते. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे होणारे नुकसानगारांमुळे उसाची पाने फाटतात, तुटतात व छिद्रे पडतात. त्यामुळे शेतात साचलेले पावसाचे पाणी त्वरित बाहेर काढण्यासाठी योग्य निचरा व्यवस्था करावी.गारपिटीमुळे ऊस पिकास झालेल्या जखमांमधून रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शिफारशीत बुरशीनाशकांची फवारणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here