कोल्हापूर : माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे गूळ सौदे पडले बंद, १६ गाड्यांची आवक रोखली

कोल्हापूर : कोल्हापुरातून गुजरातला पाठवण्यात आलेल्या काही गुळामध्ये रासायनिक रंग आढळल्याने तेथील अन्न व औषध प्रशासनाने काही व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे गुजरातमधील व्यापाऱ्यांनी कोल्हापुरातून गूळ खरेदी तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला. परिणामी, शाहू मार्केट यार्डातील स्थानिक गूळ व्यापाऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी गूळ सौद्यांना चार तास उशीर झाला होता. त्यात माथाडी कामगारांनी अचानक ‘एक दिवस आड काम’ करण्याची भूमिका घेतल्याने व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले.

माथाडी कामगारांनी ‘एक दिवस आड काम’ करण्याची भूमिका घेतल्यामुळे मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही गुळाचे सौदे झाले नाहीत. सुमारे १६ गाड्यांची आवक रोखण्यात आली. सौद्याच्या ठिकाणी सुमारे १२ गाड्या लहान गुळाच्या रव्याने भरून आणण्यात आल्या होत्या. व्यापारी व शेतकरी उपस्थित होते; मात्र माथाडी कामगार अनुपस्थित राहिल्याने सौदे सुरूच होऊ शकले नाहीत. अखेर व्यापारी, शेतकरी व बाजार समितीच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होऊन बुधवारी गूळ सौदे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तोपर्यंत गाड्या सुरक्षित ठिकाणी उभ्या करण्यात आल्या. माजी सभापती भारत पाटील व सचिव तानाजी निकम यांनी बाजारपेठेत येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. व्यापारी व शेतकऱ्यांशी चर्चेने तोडगा काढण्यात आला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here