कोल्हापूर : तिसऱ्या दिवशीही गुळ सौदे बंद, आक्रमक शेतकऱ्यांचे बाजार समितीमध्ये आंदोलन

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील हमाल दिवसाआड गुळ सौदे काढण्याच्या भूमिकेवर बुधवारीही ठाम राहिल्याने सलग तिसऱ्या दिवशी गुळ सौदे बंद राहिले. त्यामुळे गुळ घेऊन आलेले शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी बाजार समितीचे प्रवेशद्वार बंद केले. या प्रकारामुळे समितीने पोलिसांना बोलावले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर प्रवेशव्दार खुले करण्यात आले. यानंतर उपसभापती राजाराम चव्हाण यांनी हमाल, व्यापारी, शेतकरी यांच्याशी चर्चा केली. हमालांना नियमित काम करण्यास सांगितले. मात्र, हमालांनी तात्पुरत्या स्वरुपात नियमितपणे काम करण्यास तयारी दर्शविली.

हमालांच्या दिवसाआड गूळ सौदे काढण्याच्या भूमिकेबाबत समिती प्रशासनाने व्यापारी, अडते, शेतकरी, हमाल यांची शनिवारी बैठक आयोजित केली आहे. बैठकीमध्ये दिवसाआड सौद्यांबाबत निर्णय होणार आहे. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हमालांनी गुळ उतरून घेण्यास तयारी दर्शवली. मात्र, यावेळी खरेदीदार निघून गेले होते. तसेच व्यापाऱ्यांनीही इथून पुढे गुळ उतरून त्याचे पुन्हा पॅकिंग करून गुळ पुढे पाठवणे अशक्य असल्याचे सांगितले. त्यामुळे सौदे बंदच राहिल्याने गुळ विभागातील उलाढाल ठप्प राहिली. या प्रकारामुळे सलग तीन दिवस गुळ सौदे बंद राहिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here