ऊसतोडणीचे शंभर टक्के हार्वेस्टरद्वारे नियोजन करून मांजरा कारखान्याचा देशासमोर आदर्श : माजी मंत्री दिलीपराव देशमुख

लातूर : मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. ऊसतोडणीचे शंभर टक्के हार्वेस्टरद्वारे नियोजन करून कारखान्याने देशासमोर आदर्श निर्माण केला आहे. सीबीजी प्रकल्पामुळे कारखान्याने आधुनिकीकरणाच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकले आहे, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केला. कामाच्या माध्यमातून शेतकरी सभासदांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे कार्य आम्ही सातत्याने करत आहोत, असे सांगून भविष्यात अधिकपणे चांगल काम करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

यावेळी रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव ठाकूर – देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, इंदिरा सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव, सचिन पाटील, अ‍ॅड. प्रवीण पाटील, श्रीकांत बैले, महेश चव्हाण, अनिलराज पिसे, अमर वडगावकर, रिजवान अन्सारी, मयूर निळकंठ, रोहित गव्हाणे, दत्तात्रय टेकाळे, श्रीकांत माने, महादेव मस्के उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here