यंदा मॉन्सूनवर एल निनोचे संकट, साखर दरवाढीसह निर्यातबंदीची शक्यता, ‘बीएमआय’ संस्थेचा अहवाल

पुणे : भारताने इथेनॉलचे ‘ई २०’चे उद्दिष्ट साध्य केले आहे. पण देशात विकसित झालेल्या इथेनॉल निर्मिती क्षमतेचा पूर्ण वापर होत नाही. देशात जवळपास २,००० कोटी लिटर इथेनॉल निर्मितीची क्षमता आहे. परंतु तेल विपणन कंपन्यांनी केवळ १,०४८ कोटी लिटरची मागणी केली आहे. उद्योगांनी मात्र मोठा निधी खर्च करून क्षमता वाढविली आहे. त्यामुळे सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढवावे, अशी मागणी उद्योगांनी केली आहे. तर पेट्रोलियम मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांनी इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण सध्यातरी २० टक्केच राहणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, यंदाच्या मान्सूनवर एल निनोचे सावट आहे. त्यामुळे फिच सोल्यूशनच्या ‘बीएमआय’ने आपल्या अहवालात इथेनॉल निर्मिती वाढल्यास सरकारला साखर निर्यातबंदी करावी लागेल, असे म्हटले आहे. इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढविण्यासाठी उद्योगांकडून दबाव येत आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची किंमत वाढण्याचा अंदाज आहे, असे या अहवालात म्हटल्याचे वृत्त दैनिक ‘ॲग्रोवन’ने दिले आहे. बीएमआय संशोधन संस्थेने आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र इथेनॉल निर्मिती वाढल्यास साखरेचे उत्पादन कमी होईल आणि सरकारला निर्यातबंदी करावी लागेल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. जागतिक बाजारात साखरेच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

‘बीएमआय’च्या अहवालानुसार सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची किंमत १४.६ डॉलर प्रति बुशेल्स आहे. एप्रिल ते जूनदरम्यान हा भाव १६.२ डॉलर आणि जुलै ते सप्टेंबरदरम्यान १६.६ टक्के, तसेच ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान १७.२ डॉलर प्रति बुशेल्स भाव राहण्याची शक्यता आहे. तर हंगामातील सरासरी १६.२ डॉलर राहण्याचा अंदाज बीएमआयने व्यक्त केला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे म्हणाले की, पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले तरी ते २७टक्क्यांपर्यंत वाढवणे शक्य आहे. वाहनांच्या इंजिनची तेवढी क्षमता आहे. पण त्यात टप्प्याटप्प्याने म्हणजेच आधी २२ टक्के, २५ टक्के आणि नंतर २७टक्के वाढ करावी. उसाचे उत्पादनही चांगले आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मिती वाढली म्हणून साखर टंचाई होणार नाही.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here