सोलापूर: हत्तूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे स्व. यशवंत कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ समर्थ संस्था व ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाच्या वतीने नोंदणी व नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. याचे उद्घाटन माजी सरपंच तथा प्रशासक ज्योतीताई कुलकर्णी यांनी केले. शिबिरात २६७ ऊसतोड कामगारांचे नोंदणी करून व तज्ज्ञ डॉक्टरांकडून २२५ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी समर्थ संस्थेचे संस्थापक राजेंद्र कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
कुलकर्णी म्हणाले की, ऊस तोड कामगार हे कामानिमित्त आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यांनी अधिकृतपणे आपली नोंदणी करून घेणेही गरजेची आहे. यातून शासकीय योजनांचा लाभ मिळेल. यावेळी प्रा. सिद्राम म्हेत्रे, बमनिंगय्या स्वामी, भीमाशंकर कनपवडीयर, सिकंदर नदाफ, ज्योत्यप्पा सिनेवडीयर, बाबुराव नारायणे, बशीर शेख, सिद्धाराम कानडे, बनसिद्ध पटेवडियर, भीमाशंकर छप्पेकर, महादेव कांबळे, गनी शेख, शिवानंद हावडे पाटील, सोमनिंग व्हनमाने, सिद्धाराम निरवणे, सोमनिंग मनगुळे आदी उपस्थित होते.


















