सातारा : कृष्णा कारखान्यात नव्या गळीत हंगामाची जय्यत तयारी सुरु, कारखान्यात मिल रोलर पूजन

सातारा : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन उत्साहात झाले. कारखान्याचे व्हाइस चेअरमन जगदीश जगताप यांच्या हस्ते रोलरचे पूजन करण्यात आले. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते यांत्रिक कळ दाबून, रोलर बसवण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. संचालक जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, निवासराव थोरात, बाबासाहेब शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, सयाजी यादव, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, दीपक पाटील, कार्यकारी संचालक सी. एन. देशपांडे, व्यवस्थापकीय संचालक बाजीराव सुतार, वैभव जाखले, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक माणिकराव पाटील, राजारामबापू पाटील बँकेचे संचालक संग्राम पाटील, अजित पाटील, वसंतराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी चेअरमन डॉ. सुरेश भोसले म्हणाले की, सभासदांच्या आणि कामगारांच्या सहकार्यामुळे या हंगामात कृष्णा कारखान्यात उसाचे विक्रमी गाळप झाले. कारखान्याचा विकास आणि सभासदांचे हित, हेच आमचे ध्येय आहे. संपूर्ण ऊस बिल देण्यात कृष्णा कारखाना आघाडीवर आहे. कारखान्याने रोलर पूजन करण्यातही राज्यात आघाडी घेतली असून, येत्या गळीत हंगामासाठी कारखाना लवकर सज्ज होणार आहे. कारखान्याने आर्थिक शिस्त जपली आहे. सभासदांच्या अपेक्षा कारखाना व्यवस्थापन पूर्ण करत आले आहे. यावेळी, जगदीश जगताप यांचे भाषण झाले. बाजीराव सुतार यांनी स्वागत केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबसेटवार, एम. के. कापूरकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कृष्णा कारखान्यातील कामगारांना आणखी पगारवाढ लवकरच देणार असल्याची ग्वाही डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here