महाराष्ट्र : थकीत एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांनी मागितली मुदत, ७ मे रोजी पुढील सुनावणी

पुणे : राज्यातील एफआरपी थकविणाऱ्या २९ साखर कारखान्यांची सुनावणी १३ एप्रिल रोजी साखर आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. यावेळी काही कारखानदारांनी आर्थिक अडचणीची सबब देत ३० एप्रिलपर्यंत मुदत मागितली आहे. त्यामुळे साखर आयुक्तालयाने याबाबतची पुढील सुनावणी ७ मे रोजी ठेवली आहे. गेल्या काही वर्षात सातत्याने वाढलेली एफआरपी, त्या तुलनेत स्थिर असलेली एमएसपी आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे साखर कारखानदारांचे आर्थिक गणित काहीसे कोलमडले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना एफआरपी देण्यास विलंब होत असल्याचे मत साखर उद्योगातून व्यक्त होत आहे.

राज्यातील गाळप हंगाम जवळपास संपला असला तरी साखर आयुक्तालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार २ एप्रिल २०२६ अखेर साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची १०० टक्के ऊस बिले देण्यात १३९ साखर कारखाने अपयशी ठरल्याचे दिसते. साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे तब्बल २९९१ कोटी रुपये थकीत होते. मात्र, साखर आयुक्त कार्यालयाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याने काही कारखान्यांनी ऊस बिले दिली आहेत. त्यामुळे मागील आठवड्यापर्यंत १०१२ कोटी ४४ लाख रुपये थकीत होते.

ChiniMandi WhatsApp Channel

या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तालयात सोमवारी (दि. १३) ३१ मार्च २०२६ अखेरच्या अहवालानुसार थकीत रकमेपैकी ज्या कारखान्यांनी ८० टक्क्यापेक्षा कमी एफआरपी देणाऱ्या २९ कारखान्यांच्या सुनावण्या घेण्यात आल्या. त्याला २४ कारखान्यांचे प्रतिनिधी हजर होते. या साखर कारखाना प्रतिनिधींनी आर्थी अडचणीचा हवाला देत, ऊस बिले देण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत मागितली आहे. याबाबत ‘चीनी मंडी’शी बोलताना राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सांगितले कि, साखर आयुक्त कार्यालय शेतकऱ्यांना लवकरात लवकर ऊस बिलाची १०० टक्के रक्कम मिळावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here