देशात 273.90 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन, 99.20 लाख टनासह महाराष्ट्र सर्वात पुढे : NFCSF

नवी दिल्ली : नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड (NFCSF) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 14 एप्रिल 2026 पर्यंत देशातील 541 पैकी 21 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. देशात एकूण 2865.21 लाख टन ऊस गाळप करण्यात आला असून साखर उत्पादन 273.90 लाख टनांपर्यंत पोहोचले आहे. देशात सध्या 21 साखर कारखाने सुरु असून त्यापैकी तामिळनाडूमध्ये 11, उत्तर प्रदेशमध्ये 9 तर हरियाणामध्ये 1 कारखाना सुरु आहे. उर्वरित देशात गाळप हंगाम संपला आहे.

2024-25 मध्ये 534 साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला होता आणि 14 एप्रिल 2025 पर्यंत 520 कारखाने बंद झाले होते. त्याचबरोबर 2713.88 लाख टन ऊस गाळप करून 254.30 लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदाच्या हंगामात देशातील साखर रिकव्हरी मागील हंगामापेक्षा जास्त आहे. सध्या देशाची सरासरी रिकव्हरी 9.56 टक्के आहे, तर मागील हंगामात याच काळात ती 9.37 टक्के होती.

ChiniMandi WhatsApp Channel

साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर
राज्यनिहाय साखर उत्पादनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. NFCSF च्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात आतापर्यंत 99.20 लाख टन साखर उत्पादन झाले आहे, तर उत्तर प्रदेशात 89.20 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक असून तेथे 47.15 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. याशिवाय गुजरातमध्ये 7.50 लाख टन, आंध्र प्रदेशात 0.70 लाख टन, बिहारमध्ये 5.80 लाख टन, हरियाणात 4.50 लाख टन, मध्य प्रदेशात 4.50 लाख टन, पंजाबमध्ये 4.25 लाख टन, तमिळनाडूमध्ये 5.30 लाख टन, तेलंगणात 2.00 लाख टन, उत्तराखंडमध्ये 2.85 लाख टन आणि इतर राज्यांमध्ये मिळून 0.95 लाख टन साखर उत्पादन झाले आहे.

साखर रिकव्हरीत तेलंगणा अव्वल
साखर रिकव्हरीच्या बाबतीत तेलंगणा 10.75 टक्क्यांसह देशात पहिल्या क्रमांकावर आहे. 10.60 टक्क्यांसह गुजरात दुसऱ्या, तर 10.20 टक्क्यांसह उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर बिहार 9.95 टक्के, महाराष्ट्र आणि उत्तराखंड 9.50 टक्के, हरियाणा 9.40 टक्के, मध्य प्रदेश 9.30 टक्के आणि तमिळनाडू 9.10 टक्के आहेत. आंध्र प्रदेश 9.00 टक्के, पंजाब 8.70 टक्के, तर कर्नाटक 8.60 टक्क्यांसह सर्वात खाली आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here