देशाच्या एकूण साखर उत्पादनात महाराष्ट्र, यूपी आणि कर्नाटकचा सुमारे 85 टक्के वाटा

नवी दिल्ली : देशातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असून आतापर्यंत साखर उत्पादन 273.90 लाख टनांवर पोहोचले आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड (NFCSF) च्या आकडेवारीनुसार, 15 एप्रिल 2026 पर्यंत देशाच्या एकूण साखर उत्पादनात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांचा 235 लाख टनांसह सुमारे 85 टक्के वाटा आहे. साखर उत्पादनात या तीन राज्यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. या तीन राज्यात रिकव्हरीच्या बाबतीत पाहिले असता उत्तर प्रदेश 10.20 टक्के साखर उताऱ्यासह सर्वात पुढे आहे. 9.50 टक्के रिकव्हरीसह महाराष्ट्र दुसऱ्या, तर 8.60 टक्के रिकव्हरीसह कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे.

देशात आतापर्यंत 2865.21 लाख टन ऊस गाळप…

ChiniMandi WhatsApp Channel

देशातील 541 पैकी 21 साखर कारखान्यांमध्ये अजूनही गाळप सुरू आहे. आतापर्यंत देशात 2865.21 लाख टन ऊस गाळप करण्यात आले आहे. मागील हंगामात (2024-25) 534 साखर कारखान्यांनी गाळपात भाग घेतला होता आणि 15 एप्रिल 2025 पर्यंत 520 कारखाने बंद झाले होते. त्या काळात 2713.88 लाख टन ऊस गाळप करून 254.30 लाख टन साखर उत्पादन झाले होते. यावर्षी सरासरी साखर उतारा मागील हंगामापेक्षा जास्त आहे. सध्या देशातील सरासरी साखर रिकव्हरी 9.56 टक्के असून मागील हंगामात याच कालावधीत ती 9.37 टक्के होती.

साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर…

राज्यनिहाय साखर उत्पादनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. NFCSF च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आतापर्यंत 99.20 लाख टन साखर उत्पादन झाले आहे, तर उत्तर प्रदेशात 89.20 लाख टन उत्पादन झाले आहे. तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक असून तेथे 47.15 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. इतर राज्यांमध्ये गुजरात मध्ये 7.50 लाख टन, आंध्र प्रदेश मध्ये 0.70 लाख टन, बिहार मध्ये 5.80 लाख टन, हरियाणा मध्ये 4.50 लाख टन, मध्य प्रदेश मध्ये 4.50 लाख टन, पंजाब मध्ये 4.25 लाख टन, तमिळनाडू मध्ये 5.30 लाख टन, तेलंगणा मध्ये 2.00 लाख टन, उत्तराखंड मध्ये 2.85 लाख टन, तर इतर राज्यांमध्ये मिळून 0.95 लाख टन साखर उत्पादन झाले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here