उत्तर प्रदेश : उसाचा चोथा दूर करणार चेहऱ्यावरील सुरकुत्या, चौधरी चरण सिंग विद्यापीठाचे संशोधन

मेरठ : शेतकऱ्यांचे आवडते पीक असलेल्या उसाचा आता इतर उद्योगांनाही फायदा होणार आहे. उसावर प्रक्रिया केल्यानंतर उरलेल्या चोथ्यापासून आता लॅक्टिक ॲसिड सहजपणे तयार करता येणार आहे. चौधरी चरण सिंग विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. आर. के. सोनी आणि डॉ. मनीषा भारद्वाज यांनी उसाच्या चोथ्यापासून लॅक्टिक ॲसिड तयार करण्याची एक सोपी आणि प्रभावी प्रक्रिया विकसित केली आहे. या पद्धतीचे पेटंट घेण्यात आले आहे. या नवीन प्रक्रियेने शेतीतील कचऱ्याचा प्रभावी वापर, कमी खर्चाची उत्पादन प्रक्रिया, उच्च कार्यक्षमता आणि जास्त उत्पादन या गोष्टी साध्य होणार आहेत. तसेच हे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान औद्योगिक स्तरावर विस्तारण्यायोग्य असेल.

चौधरी चरणसिंग विद्यापीठ लवकरच ही पद्धत उद्योगांमध्ये हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. लॅक्टिक ॲसिड हे एक महत्त्वाचे रसायन असून त्याचा उपयोग अन्न, औषधे, सौंदर्यप्रसाधने आणि बायोडिग्रेडेबल प्लास्टिक (पीएलए) यांच्या उत्पादनात होतो. लॅक्टिक ॲसिडचा वापर सामान्यतः त्वचेच्या काळजीसाठीच्या उत्पादनांमध्ये केला जातो. याचा अर्थ असा की, उसाच्या चोथ्यापासून मिळवलेले लॅक्टिक ॲसिड चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास देखील मदत करू शकते. प्रा. आर. के. सोनी आणि डॉ. मनीषा भारद्वाज यांच्या मते, या पद्धतीत उसाचा चोथा धुऊन वाळवला जातो. त्यानंतर तो बारीक कणांमध्ये दळला जातो आणि त्यावर अमोनिया व सल्फ्यूरिक ऍसिडची प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमुळे लिग्निन काढून टाकले जाते आणि सेल्युलोज विघटनशील बनते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here