महाराष्ट्राची यंदा साखर उत्पादनात देशात आघाडी, उत्तर प्रदेशला टाकले मागे

पुणे : अखेर राज्यातील ऊस गळीत हंगामाची समाप्ती झाली आहे. यंदा १ हजार ४५ लाख टन ऊस गाळपातून ९९ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. राज्यात सरासरी ९.४९ टक्के साखरउतारा मिळाला. यंदा देशात सर्वाधिक साखर उत्पादन महाराष्ट्रात झाले आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेशात ८९ लाख टन, तर कर्नाटकमध्ये ४७ लाख टन साखर उत्पादित झाली. महाराष्ट्रात हंगामाच्या सुरुवातीला १०६ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज असताना हंगामाच्या अखेरच्या काळात उसाला आलेले तुरे यामुळे उत्पादनात घट झाली.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या आकडेवारीनुसार साखर उत्पादनात यंदा महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आला आहे. महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशात ८९ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशात ९० लाख टन तर महाराष्ट्रात ८० लाख टन साखरेचे उत्पादन घेण्यात आले होते. यंदा महाराष्ट्राने उत्तर प्रदेशाला मागे टाकले आहे. महाराष्ट्रात यंदा एक नोव्हेंबर रोजी ऊस गाळप हंगामास सुरुवात झाली. एकूण २१० कारखान्यांनी साधारण पाच महिन्यांच्या काळात राज्यात १ हजार ४५ लाख टन उसाचे गाळप केले. त्यातून ९९ लाख १८ हजार टन साखर उत्पादित झाली.

ChiniMandi WhatsApp Channel

सर्वाधिक २३ लाख टन साखर कोल्हापूर विभागातून तर त्या खालोखाल पुणे विभागात २२ लाख टन तर सोलापूर विभागात १९ साखर उत्पादित केली आहे. अहिल्यानगर विभागात ११ लाख टन, संभाजीनगरमध्ये १० व नांदेड विभागात ११ लाख टन साखर उत्पादित केली आहे. यंदा साखर उतारा चांगला असतानाही प्रत्यक्ष साखर उत्पादन सात लाख टनांनी घटले आहे. मात्र, गेल्या गाळप हंगामाच्या तुलनेत यंदा १८ लाख टन साखर उत्पादन अधिक झाले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here