खतौली : चालू गाळप हंगामात येथील त्रिवेणी साखर कारखान्याने उत्तर प्रदेशात सर्वाधिक उसाचे गाळप करण्याचा विक्रम केला आहे. कारखान्याने २७ ऑक्टोबर २०२५ रोजी गाळप हंगामाला सुरुवात केली आणि १६ एप्रिल २०२६ रोजी हंगाम समाप्ती झाली. एकूण २०७.७८ लाख क्विंटल उसाचे गाळप झाले. कारखान्याने ३ एप्रिलपर्यंतची सर्व ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहेत. आतापर्यंत ७७८.६८ कोटी रुपये दिले असल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली. चालू गाळप हंगामातील उर्वरीत बिलेही लवकरच जमा केली जातील असे त्यांनी सांगितले.
सध्या साखर कारखान्याच्या परिसरात शेंडा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून, त्यासाठी कारखाना शेतकऱ्यांना अनुदानित दरात कीटकनाशके पुरवत आहे. अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात प्रात्यक्षिक भूखंड उभारून त्यांना प्रोत्साहनही दिले जात आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. अशोक कुमार यांनी परिसरातील सर्व शेतकरी, विभागीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. ऊस विभागाचे महाव्यवस्थापक, कुलदीप राठी यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कीड आणि तणांवर यांत्रिक पद्धतींनी नियंत्रण मिळवण्याचे आवाहन केले आहे.


















