कोल्हापूर : सरसेनापती घोरपडे कारखाना यंदा करणार दहा लाख टन ऊस गाळप – अध्यक्ष नाविद मुश्रीफ

कोल्हापूर : बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या तेराव्या गळीत हंगामाच्या मिल रोलरचे पूजन अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. आगामी गळीत हंगामात दहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हंगामाच्या पहिल्या दिवसापासूनच साडेआठ ते नऊ हजार टन वाढीव गाळप क्षमतेने सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त त्रिपक्षीय करारानुसार १ एप्रिल २०२६ पासून पगारवाढ लागू केली जाणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केली.

अध्यक्ष मु्श्रीफ म्हणाले की, गतवर्षी व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात झालेला करार व त्रिपक्षीय करारच्या शिफारशीनुसार प्रत्येक वर्षी पगारात वार्षिक वाढ देण्याचे ठरले होते. त्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. दरम्यान, या कार्यक्रमात ऊसतोडणी वाहतूकदारांना अॅडव्हान्स धनादेश, मृत कामगारांच्या वारसदारांना विमा रकमेचे धनादेश, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान धनादेश वाटप झाले. लेबर ऑफिसर संतोष मस्ती यांनी स्वागत केले. जनरल मॅनेजर संजय घाटगे यांनी प्रास्ताविक केले. विशाल बेलवळेकर यांनी सूत्रसंचालन केले. मोहन पोवार यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here