पुणे : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये २०२६-२७ गळीत हंगामाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. मशिनरी ओव्हर ऑयलिंग, रिपेअरिंगची कामे सुरू केली असून ही कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करुन ऑक्टोबर महिन्यात प्लॅन्ट गाळपासाठी सज्ज राहण्याचे नियोजन करण्यात येत आहे. कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारी ऊसतोड वाहतूक वाहन टोळी, ट्रॅक्टर टायरगाडी, टायरबैलगाडी व ऊस तोडणी यंत्राचे करार सुरू केले आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
अक्षय तृतीयेच्या मुर्हतावर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे व उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील व संचालक मंडळाच्या हस्ते मशिनरी ओव्हर ऑयलिंग करून व मिल रोलरचे पूजन करुन प्रत्यक्षात जोडणीचे कामास सुरुवात करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला कारखान्याचे संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, बाजीराव बारवे, ज्ञानेश्वर अस्वारे, रामहरी पोंदे, संचालिका पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, जनरल मॅनेजर (टेक्निकल) शिरीष सुर्वे, सेक्रेटरी रामनाथ हिंगे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, डिस्टीलरी मॅनेजर प्रतापसिंह सावंत, कामगार कल्याण अधिकारी सुरेश शिंदे, सिव्हील इंजीनिअर अमीर पठाण, पर्चेस अधिकारी ब्रिजेश लोहोट, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे व कामगार आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी ऊस तोडणी यंत्राचे करार करणेसाठी इच्छुक असणाऱ्या मशीन मालकांनी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी आपला ऊस आपल्याच कारखान्यास गळितास द्यावा, असे आवाहन केले.


















