सातारा : धामणेरच्या प्रगतशील शेतकऱ्याने एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने घेतले उसाचे एकरी १०३ टन उत्पादन

सातारा : धामणेर (ता. कोरेगाव) गावातील सौरभ विनयकुमार कोकीळ या तरुण पदवीधराने आधुनिक एआय तंत्रज्ञानाने ऊस शेती फुलवली आहे. आपल्या उत्पादन खर्चात २५ टक्के बचत करत एकरी १०३ टन विक्रमी उत्पादन मिळविण्यात ते यशस्वी झाले आहेत. सौरभ यांच्याकडे एकूण ३० एकर शेती असून बहुतांश ऊस व आले लागवड असते. उसात ‘को ८६०३२ वाणाचा वापर केला जातो. त्यांनी वसंसादादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय, मांजरी) येथे २०१६ मध्ये ऊस शेतीविषयीचे प्रशिक्षण घेतले. येथील डॉ. राजेंद्र भोईटे तसेच पाडेगाव ऊस संशोधन केंद्रातील डॉ. भरत रासकर, डॉ. धमेंद्रकुमार फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली मातीची सुपीकता वाढवण्यासाठी प्रयत्न केले.

सौरभ यांचा ऊस उत्पादनातील सातत्य कायम असल्याने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकच्या माध्यमातून ‘एआय’ तंत्रज्ञानसाठी बारामती केव्हीके येथे पाठविण्यात आले. सुरुवातीला अशक्य वाटणारे एकरी १३० टनांचे उदिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शुद्ध बेणेमळ्याचा प्रयोग यशस्वी केला. २०२४ मध्ये त्यांनी ‘एआय’ कीट बसवले. यामध्ये वेटर स्टेशन, पागी-खत व्यवस्थापनासाठी सेन्सर, मोबाइल अॅप आदींचा समावेश होता. त्यांनी दीड एकर क्षेत्रावर बारामती केव्हीके यांनी दिलेल्या को-८६०३२ या वागाच्या रोपांची एक जुलै २०२४ गध्ये सागवड केली. साडेचार बाय दोन फूट अंतरावर एकरी ५८४० रोपे लावली. बाज भरणी व मोटी भरणीचे हे दोन डोस वगळता इतर सर्व विद्राव्य खतांचा वापर केला. त्यांना दीड एकरातून १५५ टन, तर एकरी सरासरी १०३ टन उत्पादन मिळाले. एआय तंत्रज्ञारामुळे उत्पादन खर्चात सुमारे २५ टक्के बचत केल्याचे सौरभ यांनी सांगितले. पाण्याचे नेमके व्यवस्थापन करणे सोपे झाले, खतावरील एकूण खर्चात १५ ते २० टक्क्यांची बचत. पायी वापरात २५ ते ३० टक्क्यांची बचत झाल्याचे त्यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here