कर्नाटक: थकीत ऊस बिलांसाठी मैसूरमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन

मैसूर: कर्नाटक राज्य ऊस उत्पादक संघाच्या कार्यकर्त्यांनी मैसूर येथे उपायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केले. शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे नंजनगुड तालुक्यातील बन्नारी अम्मन शुगर मिल्सला ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत देयके तात्काळ देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली. उपायुक्त कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाण्याचा प्रयत्न करताना शेतकरी आणि पोलिसांमध्ये तीव्र वाद झाला. पोलिसांनी शेतकऱ्यांना कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यापासून रोखले.

उपायुक्तांनी शेतकरी नेते आणि साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत थकीत रक्कम, तसेच प्रति टन 100 रुपयांच्या अतिरिक्त प्रोत्साहनासह देयके लवकरच देण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांनी आरोप केला की, ना कारखाना व्यवस्थापनाने, ना जिल्हा प्रशासनाने प्रति टन 100 रुपयांच्या प्रोत्साहन रकमेचा भरणा केला आहे.आंदोलकांनी शेतकऱ्यांना कर्जवाटपासाठी सिबिल स्कोअरच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्या मान्य होईपर्यंत उपायुक्त कार्यालयाबाहेर अनिश्चितकालीन आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here