महाराष्ट्र : राज्यात साखर कारखान्यांनी थकवली २१३० कोटींची ऊस बिले, ११७ कारखाने संपूर्ण ऊस बिले देण्यात अपयशी

मुंबई : राज्यातील गळीत हंगाम संपला असला तरी साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची सर्वच्या सर्व ऊस बिले देण्यात ११७ साखर कारखाने अपयशी ठरले आहेत. साखर आयुक्तालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार १५ एप्रिल २०२६ अखेर राज्यातील साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे तब्बल २१३० कोटी रुपये थकीत आहेत. आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या नजरा थकीत ऊस बिल कधी मिळणार ? याकडे लागल्या आहेत.

साखर आयुक्तालयाने १५ एप्रिलपर्यंतचा उसाच्या एफआरपीचा अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यात चालू हंगामात २०९ कारखाने सुरू झाले होते. यापैकी सुमारे दीडशे कारखान्यांचा साखर हंगाम फेब्रुवारीअखेर, तर उरलेल्यांचा मार्चअखेर संपला होता. तरीही २१३० कोटींची देणी साखर कारखान्यांकडे थकीत आहेत. तब्बल ११७ कारखान्यांनी फक्त साठ टक्क्यांपर्यंतच एफआरपी अदा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत केवळ ९२ कारखान्यांनी १०० टक्के; तर ८४ कारखान्यांनी ८० ते ९९.९९ टक्के एफआरपी अदा केली आहे. जवळपास १४० साखर कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणावर ऊस बिले थकीत आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel

राज्यातील केवळ ९२ कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली आहे. ८४ साखर कारखान्यांनी ८० ते ९९.९९ टक्के, २३ साखर कारखान्यांनी ६० ते ७९.९९ टक्के आणि १० कारखान्यांनी ० ते ५९.९९ टक्के एफआरपी दिली आहे. राज्यातील ११७ कारखाने वेळेत १०० टक्के एफआरपी देण्यात अपयशी ठरले आहेत. हंगाम संपला आणि आगामी हंगामासाठी कारखानदारांकडून तोडणी वाहतूक करार सुरु करार सुरु करण्यात आले तरीसुद्धा कारखानदारांनी शेतकऱ्यांची ऊस बिले दिलेली नाहीत. साखर आयुक्तांनी ऊस बिले देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कारखान्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी आणि विविध शेतकरी संघटनाकडून होत आहे. एफआरपीच्या तुलनेत साखरेसह वीज, इथेनॉल या उपपदार्थांचे दर वाढणे आवश्यक आहे असल्याचे कारखानदारांचे मत आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here