सांगली :राज्याच्या साखर उद्योगात उदगिरी शुगर अँड पॉवर लि. ने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या डॉ. शिवाजीराव कदम यांनी स्थापन केलेल्या उदगिरी शुगर अँड पॉवर लि. ने शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा अधिक रक्कम देण्याची परंपरा यंदाही कायम राखली आहे. ‘उदगिरी शुगर’मुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती झाली आहे. यामध्ये डॉ. शिवाजीराव कदम आणि चेअरमन डॉ. राहुल शिवाजीराव कदम यांचे योगदान मोठे आहे.
बामणी पारे (जि. सांगली) येथील उदगिरी शुगर हा साखर कारखाना चेअरमन डॉ. राहुल शिवाजीराव कदम यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी घोडदौड करत आहे. योग्य व्यवस्थापन आणि शेतकरी हिताचा पारदर्शी कारभार यामुळे कारखाना आदर्श बनला आहे. उदगिरी शुगरने यंदा पाच लाख टनांपेक्षा अधिक ऊस गाळप केले असून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले वेळेआधी अदा केली आहेत. विशेष म्हणजे कारखाना व्यवस्थापनाने शेतकऱ्यांना एफआरपीनुसार देय असलेल्या रकमेपेक्षा सुमारे ८९६ लाख रुपये अधिक दिले आहेत. याशिवाय उदगिरी शुगरने सीएसआर अंतर्गत अनेक व्यक्ती आणि संस्थांना भरीव मदत केली आहे.


















