सांगली : ऊसतोड मजूर पुरविण्याच्या आमिषाने शिराळ्यात शेतकऱ्याची सहा लाखांची फसवणूक

सांगली : गळीत हंगामात ऊस तोडणी मजूर पुरवण्याचे आमिष दाखवून एका शेतकऱ्याची सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विश्वजित लक्ष्मण पाटील (वय २६, रा. गांगले नांदोली वसाहत, ता. शिराळा) यांनी शिराळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दिनेश सुभाष निंबाळकर (रा. सिसरगाव, ता. वैजापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गळीत हंगाम २०२४-२५ यांदरम्यान हा प्रकार घडला. त्यावेळी त्यांना ऊस गळीत हंगामासाठी त्यांना ऊसतोड मजुरांची आवश्यकता होती. यासाठी त्यांनी संशयित दिनेश निंबाळकर याच्याशी करार केला. फिर्यादीने आरोपीला शिराळा येथे १ लाख रुपये रोख दिले. त्यानंतर वेळोवेळी बँकेमार्फत ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवले. अशा प्रकारे आरोपीने एकूण ६,००,००० रुपये घेतले. पैसे घेऊनही संशयित दिनेश निंबाळकर याने गळीत हंगामात मजूर पुरवले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची तक्रार पाटील यांनी दिली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here