सोलापूर : विठ्ठलराव सहकारी शिंदे साखर कारखान्याचे युनिट नं. १ पिंपळनेर व युनिट नं.२ बबनराव शिंदे करकंब या कारखान्याचे सन २०२५-२६ गळीत हंगामामध्ये ऊस तोडणी वाहतूक केलेल्या ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार व मुकादम यांच्या बँक खात्यावर कमिशन डिपॉझीट रक्कम वर्ग करण्यात आली असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष माजी आ. बबनराव शिदे यांनी दिली.
माजी आ. शिंदे म्हणाले की, युनिट नं. १ पिंपळनेर व युनिट नं.२ करकंब या कारखान्याचा सन २०२५-२६ गळीत हंगाम बंद झाला असून या हंगामात युनिट नं. १ कडे १५ लाख ५४ हजार ५६२ मे. टन गाळप होऊन १० लाख ३३ हजार ९०० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झाले आहे. तसेच युनिट नं.२ कडे ५ लाख २४ हजार ४५१ मे. टन गाळप होऊन ४ लाख ८६ हजार १५० असे एकूण २० लाख ७९ हजार ०१३ मे. टन उसाचे गाळप होऊन १५ लाख २० हजार ५० क्विंटल साखर पोती उत्पादित झाली आहेत.


















