सोलापूर : जयहिंद शुगरकडून २७ जानेवारीअखेरची ऊस बिले जमा, शेतकऱ्यांना मिळाले १८३ कोटी रुपये

सोलापूर : आचेगाव येथील जयहिंद शुगर कारखान्याने गळीत हंगामासाठी ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना दि. २७ जानेवारीपर्यंतची ऊस बिले जमा केली आहेत. कारखान्याने गळीत हंगामात ६ लाख ६६ हजार मे. टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात १८३ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. कारखान्याने २०२५ -२६ या गळीत हंगामासाठी दि. २८ जानेवारीपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऊस बिलांच्या रकमा जमा केल्याची माहिती ऊस पुरवठा अधिकारी मनोज सावंत यांनी दिली.

सावंत म्हणाले की, कारखान्याच्या व्यवस्थापनाने दिनांक २७ जानेवारीपर्यंती ऊस बिले शेतकऱ्यांना दिली आहेत. आता दि. २८ जानेवारी तसेच ६, ७, ८ फेब्रुवारी या चार दिवसांत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची ऊस बिल अद्याप देणे बाकी आहे. ही सुमारे ४ कोटी ५० लाख रुपये रक्कम दिनांक १२ ते १३ फेब्रुवारीपर्यंत अदा केली जाईल. जयहिंद शुगरचे चेअरमन गणेश माने-देशमुख यांनी सांगितले की, आपल्या पूर्वजांनी स्वतःच्या प्रॉपर्टी विकून शेतकऱ्यांसाठी साखर कारखाने उभे केले आहेत. ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांना काहीसा त्रास झाला, त्यांनी तो सोसला. भूमिपुत्रांनी उभी केलेली ही साखर कारखानदारी शेवटी भूमिपुत्रांनीचं जपली पाहिजे. त्यामुळे कारखान्याने आर्थिक अडचणीतून मार्ग काढला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here