पुणे : सोमेश्वर साखर कारखाना उपाध्यक्षपदाच्या निवडीकडे लागले लक्ष

पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षांचा कार्यकाळ संपला असून नवीन उपाध्यक्ष कोण होणार ? याबाबत उत्सुकता लागली आहे. कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असल्याने उपाध्यक्षाला मर्यादित कालावधीसाठी काम करण्याची संधी मिळणार आहे. उपाध्यक्षपदासाठी इच्छुक संचालकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. त्या कोणाच्या बाजूने कौल देतात, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर कारखान्याच्या निवडप्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर आली आहे. बारामती, पुरंदर, खंडाळा आणि फलटण या चार तालुक्यांचा कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्याच्या उपाध्यक्षपदाला राजकीय आणि संघटनात्मक वजन राहिले आहे. मागील काळात आनंदकुमार होळकर, प्रणीता खोमणे, बाळासाहेब कामठे आणि मिलिंद कांबळे यांनी उपाध्यक्षपद भूषवले. विद्यमान उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांचा कार्यकाळ ३ एप्रिलला संपला आहे. पुढील नाव लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here