नंदुरबार : थकीत ऊस बिलासाठी साखर कारखान्यांना शेतकऱ्यांचा ५ मेपर्यंत ‘अल्टिमेटम’

नंदुरबार : नियमानुसार ऊसतोड झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पैसे देणे बंधनकारक असतानाही, दोन ते अडीच महिने उलटूनही पेमेंट न झाल्यान शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. काही कारखान्यांकडे १६ जानेवारी २०२६ पासून गळीत हंगाम संपेपर्यंतचे उसाचे पेमेंट थकीत आहे. यासंदर्भात गुरुवारी प्रकाशा येथील सद्‌गुरू धर्मशाळेत नर्मदा बचाव आंदोलन व किसान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत ५ मे पर्यंत उसाची थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास १६ मेपासून संबंधित साखर कारखान्यांच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येईल, असे सर्वानुमते ठराव घेण्यात आला.

बैठकीत शेतकऱ्यांनी उसाचे पेमेंट मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. नर्मदा बचाव आंदोलन व किसान मोर्चाचे रामकृष्ण चौधरी, हरी दत्तू पाटील, अशोक चौधरी, श्रीराम चौधरी, सचिन चौधरी, कृष्णकांत सोनवणे, रवींद्र पटेल, प्रवीण पटेल, शिवनाथ पाटील, राजाराम पाटील, राजेश्वर पाटील, प्रकाश पाटील, सविता चौधरी, नीलेश पाटील, वसंत पटेल, अंबालाल पटेल, शंकर चौधरी यांसह परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन संबंधित साखर कारखाने, तहसीलदार शहादा व पोलिस प्रशासनाला दिले. नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनाही निवेदन देण्यात आले. थकीत रक्कम देय तारखेपासून १५ टक्के व्याजासह ५ मेपर्यंत अदा करण्याची मागणी केली यात करण्यात आली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here