सातारा : सह्याद्री कारखान्याकडून ३०४ कोटी नऊ लाखांची ऊस बिले अदा

सातारा : यशवंतनगर (ता. कऱ्हाड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ या गळीत हंगामात कारखान्याने २०२५-२६ गळीत हंगामात ८ लाख ६८ हजार ८३१ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. यंदा कारखान्याकडे गळितास आलेल्या उसास प्रती मेट्रिक टन ३५०० रुपये दर जाहीर करण्यात आला होता. या ऊसबिलाची ३०४ कोटी ९ लाखांची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. आता येत्या हंगामात प्रतिदिन ११ हजार व त्याहीपेक्षा जास्त ऊस गळीत करण्याचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.

कारखाना प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सह्याद्री कारखान्याने नेहमीच रास्त व उच्च दराची परंपरा जोपासली आहे. कारखान्याने प्रतिदिन ७५०० मेट्रिक टनावरून ११ हजार मेट्रिक टन विस्तार वाढ प्रकल्प यशस्वीरीत्या कार्यान्वित केला. आगामी २०२६-२७ गळीत हंगामात नोंदविलेल्या संपूर्ण उसाचे गाळप करण्यासाठी आवश्यक ती ऊसतोडणी वाहतूक यंत्रणा उभारणीचे काम सुरू आहे. ऊस उत्पादकांनी नोंदविलेला संपूर्ण ऊस ‘सह्याद्री’कडेच गळितास पाठवावा, असे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here