अहिल्यानगर : अगस्ती कारखान्यात आगामी हंगामाच्या तयारीला वेग; ऊसतोड मजूर नियोजनाला गती

अहिल्यानगर : अगस्ती साखर कारखान्याच्या आगामी हंगामासाठी प्राथमिक तयारीला वेग आला असून, ऊसतोड मजुरांच्या टोळ्यांचे नियोजन सुरू झाले आहे. बुधवारी ऊस तोडणी टोळी मुकादमांना आगाऊ रक्कम देण्यात आली. सध्या कारखाना अडचणीत असून कामगारांना ले-ऑफ देण्यात आला आहे. कारखान्याचे आर्थिक नुकसान कमी व्हावे हा त्यामागील उद्देश आहे. शेतकरी, सभासदांनी भूलथापांना बळी पडू नका, अगस्ती साखर कारखान्याचा २०२६-२७ चा गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी दिली.

यावेळी गायकर म्हणाले की, तालुक्यातील अगस्ती साखर कारखाना हा अर्थकारणाचा कणा मानला जातो. या कारखान्यामुळे हजारो कुटुंबांचे संसार फुलले असून स्थानिक बाजारपेठेला मोठा आधार मिळतो. मात्र, कारखान्याची चिमणी थंडावली तर त्याचे परिणाम गंभीर होतील. कारखान्यातर्फे दिवाळीपूर्वी राहिलेले दोनशे रूपये प्रती टन शेतकऱ्यांना देऊन दिलेला शब्द पाळू. ज्येष्ठ संचालक पर्बत नाईकवाडी, अशोक देशमुख, विकास शेटे, बाळासाहेब नाईकवाडी, कार्यकारी संचालक सुधीर कापडणीस, मुख्य लेखापाल विजय सावंत, गबरू मुकादम आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here