लातूर : आगामी गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना प्रशासन सज्ज असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कार्यक्षमता वाढविण्यावर भर दिला जात आहे. कारखान्याच्या प्रगतीसाठी आणि शेतकरीहिताच्या दृष्टीने सर्वांनी एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले. येथे आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर मिल रोलर पूजन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला संत शिरोमणी मारूती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन श्याम भोसले, व्हाइस चेअरमन सचिन पाटील, मांजरा कारखान्याचे व्हॉइस चेअरमन अशोक काळे, शेती कमिटी अध्यक्ष कैलास पाटील, संचालक तात्यासाहेब देशमुख, नवनाथ काळे, वसंत उफाडे, धनराज दाताळ, सचिन शिंदे, सदाशिव कदम, निळकंठ बचाटे, दयानंद बिडवे, शंकर बोळंगे, विलास चामले, अरुण कापरे, अनिल दरकसे, बालासाहेब पांढरे, श्रीकृष्ण काळे, सुरेश चव्हाण, तानाजी जाधव, कार्यकारी संचालक पंडित देसाई उपस्थित होते.


















