सांगली : केडीसी बँक हुतात्मा कारखान्याच्या पाठीशी असल्याचा गौरव नायकवडी यांचा दावा

सांगली : हुतात्मा साखर कारखान्यासमोरील ठिय्या आंदोलनाला शनिवारी २० दिवस झाले ज्येष्ठ मार्गदर्शक किरण नायकवडी, केदार नायकवडी आणि गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी राजीनामा द्यावा व कारखान्यावरील कर्जाची जबाबदारी स्वीकारावी, ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. याबाबत गौरव नायकवडी यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक हुतात्मा साखर कारखान्याला लागेल ते आर्थिक सहकार्य करेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. सभासद शेतकऱ्यांच्या संघटित ताकदीवर कारखान्याचे पूर्वीपेक्षा चांगले दिवस पुन्हा येतील, असा दावा केला. मंगळवारी निधी उपलब्ध होताच तोडणी व वाहतूक करार करण्यात येणार असून, उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे गौरव नायकवडी यांनी सांगितले.

दरम्यान, शनिवारी सकाळी १० वाजता उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर यांच्या अध्यक्षतेखाली मासिक बैठक आयोजित करण्यात आली असून, अध्यक्ष वैभव नायकवडी उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनातून मार्ग निघावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी रात्री उशिरापर्यंत अध्यक्ष वैभव नायकवडी, आंदोलक नेते किरण नायकवडी, गौरव नायकवडी आणि केदार नायकवडी यांची संयुक्त बैठक घेऊन समेटाचा प्रयत्न केला. मात्र वैभव नायकवडी राजीनामा देण्यास तयार नसल्याने आणि किरण नायकवडी राजीनाम्याशिवाय माघार घेण्यास तयार नसल्याने कोणताही तोडगा निघू शकला नाही. तर मंत्री हसन मुश्रीफ यांनीही मार्गदर्शन केले. कोल्हापूर येथे हुतात्माचे संचालक, कार्यकारी संचालक, केदार नायकवडी तसेच काही अधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांनी केडीसी बँकेच्या कार्यकारी संचालकांची भेट घेऊन आर्थिक प्रस्ताव सादर केला. त्यांनी सुचविलेल्या भूमिकेनुसार वाटचाल करण्यास सर्वांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे वर्षाला कोट्यवधी रुपयांची बचत होणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

हुतात्मा कारखान्यातील बैठकीस अध्यक्ष वैभव नायकवडी उपस्थित राहणार

हुतात्मा साखर कारखान्याच्या आज, शनिवारी होणाऱ्या साप्ताहिक बैठकीसाठी अध्यक्ष वैभव नायकवडी उपस्थित राहणार आहेत. गेले १९ दिवस हुतात्मा साखर कारखान्यासमोर नायकवडी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मात्र अद्यापही ठोस तोडगा निघाला नाही. यांदरम्यान, वेगवेगळ्या ठिकाणी बाजू मांडणारे अध्यक्ष वैभव नायकवडी व गौरव नायकवडी, केदार नायकवडी व किरण नायकवडी उद्या साप्ताहिक बैठकीत एकत्र येत असल्यामुळे काय निर्णय होणार, याची उत्सुकता सभासद, शेतकरी, कार्यकर्त्यांना आहे.

दरम्यान, काल हुतात्मा कारखान्याचे संचालक, कार्यकारी संचालक, काही अधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत प्रस्ताव सादर केला. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक हुतात्मा कारखान्याला हवे ते आर्थिक सहकार्य करेल, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. तर आमदार सदाभाऊ खोत यांनी आंदोलनस्थळी भेट देत समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न केला. आंदोलक मागण्यांवर ठाम असल्याने त्यांना यश आले नाही. आता साप्ताहिक बैठकीसाठी अध्यक्ष वैभव नायकवडी उपस्थित राहणार असल्याची माहिती पुढे येत आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here