महाराष्ट्र : यंदा सरासरी १०५ दिवस चालला गाळप हंगाम; राज्यात ९९.१८ लाख टन साखर उत्पादन

पुणे : राज्यातील सन २०२५-२६ चा ऊस गाळप हंगाम संपला असून, सरासरी १०५ दिवस हंगाम चालला आहे. तर, १० कोटी ४५ लाख ५८ हजार मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण झाले असून, ९९ लाख १८ हजार मेट्रिक टनांइतके साखर उत्पादन हाती आले आहे. तर, ९.४९ टक्क्यांइतका निव्वळ साखर उतारा मिळाला असल्याची माहिती साखर आयुक्ताल यातून मिळाली. ऊस गाळपात पुणे आणि सोलापूर विभाग अग्रस्थानी राहिला असून, साखर उत्पादन आणि उताऱ्यामध्ये कोल्हापूर विभागाने आपले वर्चस्व कायम ठेवल्याचे ऊस गाळप हंगामाच्या अंतिम अहवालावरून दिसून येत आहे.

राज्यातील १०२ सहकारी आणि १०७ खासगी मिळून एकूण २०९ साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम घेतला. या सर्व कारखान्यांची मिळून दैनिक ऊस गाळप क्षमता सुमारे १० लाख ७ हजार ८०० मेट्रिक टन राहिली. तुलनात्मक स्थिती विचारात घेता राज्यात गतवर्षीच्या हंगाम २०२४-२५ मध्ये १९९ साखर कारखान्यांनी मिळून एकूण ८५३.८२ लाख मे. टनांइतकेच ऊस गाळप पूर्ण केले होते. म्हणजेच गतवषपिक्षा यंदा सुमारे १९१.७६ लाख मे. टनांनी अधिक ऊस गाळप पूर्ण झाले असून, १८२.५१ लाख विंवटलने साखर उत्पादनात वाढ झालेली असल्याची माहिती साखर आयुक्तालयातून दिली.

ChiniMandi WhatsApp Channel

पुणे विभागातील ३२ कारखान्यांनी मिळून एकूण २२२ लाख ५५ हजार मे. टन, तर सोलापूरमधील ४९ कारखान्यांनी एकूण २२२ लाख ५ हजार मे. टनांइतके ऊस गाळप पूर्ण केले. तिसऱ्या स्थानावर कोल्हापूर विभाग राहिला असून, तेथील ३८ कारखान्यांनी मिळून एकूण २१० लाख ४६ हजार मे. टन ऊस गाळप पूर्ण केले. मात्र, २३१.९१ लाख क्विटल इतके सर्वाधिक साखर उत्पादन व ११.०२ टक्क्यांइतका सर्वाधिक साखर उतारा मिळवून कोल्हापूरने बाजी मारली. तुलनेने विभागनिहाय स्थिती पाहता साखर पुणे ९.८८ टक्के व सोलापूर विभागाला ८.६१ टक्के साखर उतारा मिळाला आहे.

मंत्री समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार ऊस गाळप हंगामाचे केलेले नियोजन यशस्वी झाले. साखर आयुक्तालय आणि मिटकॉन संस्थेच्या हंगामपूर्व अंदाजानुसार २०२५-२६ हंगामात एकूण १०५ लाख मे. टनाचा साखर उत्पादन अपेक्षित होते. तर, प्रत्यक्षात साखरेचे ९९ लाख मे. टनांइतके उत्पादन मिळाले असून, अंदाजात मोठा फरक पडलेला नाही. यंदा सरासरी १०५ दिवस हंगाम चालला आहे. उसाची वाढलेली दैनिक गाळप क्षमता आणि १५० दिवसांचे ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवून ऊस उत्पादकता वाढीवर सांधिक भर देण्याची आवश्यकता आहे, असे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दैनिक ‘पुढारी’ला सांगितले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here