महाराष्ट्र : २० मेपूर्वी शेतकऱ्यांची एफआरपी जमा करा, अन्यथा आरआरसी अंतर्गत कठोर कारवाई; साखर कारखान्यांना साखर आयुक्तांचा इशारा

पुणे : राज्यातील गाळप हंगाम संपून अनेक दिवस उलटूनही अनेक साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अद्याप शंभर टक्के एफआरपीची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तांनी आज थकीत एफआरपी असलेल्या साखर कारखान्यांची सुनावणी घेत कारखानदारांना कडक सूचना दिल्या. २० मेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात थकीत रक्कम जमा करावी, अन्यथा आरआरसी कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील अनेक साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची एफआरपी थकीत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत अनेक शेतकरी तसेच विविध राजकीय नेत्यांनी साखर आयुक्तांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. शेतकऱ्यांची रखडलेली एफआरपी लक्षात घेऊन साखर आयुक्त कार्यालयात आज विशेष सुनावणी घेण्यात आली. या बैठकीला राज्यभरातील ५० हून अधिक साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुनावणीदरम्यान साखर आयुक्तांनी कारखानदारांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, २० मेपर्यंत थकीत एफआरपीची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. आदेशांचे पालन न केल्यास संबंधित कारखान्यांवर महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here